ग्रामपंचायत पांगरी बु.

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

भूमिगत गटार करणे

74

पांगरी बु. ग्रामपंचायतीने गावातील सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी भूमिगत गटार योजना राबवली. या योजनेअंतर्गत गावातील घरगुती व सार्वजनिक सांडपाण्याचे सुरक्षितपणे निचरा होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली.

पांगरी बु. गाळे बांधकाम करणे

73

गावात स्थानिक व्यावसायिकांसाठी गाळे बांधण्यात आले, ज्यामुळे बाजारपेठ व रोजगाराला चालना मिळाली आहे.

पांगरी बु. गावात बाकडे बसविणे

72

नागरिकांच्या विश्रांतीसाठी सार्वजनिक ठिकाणी बाकडे बसविण्यात आले आहेत. यामुळे वयोवृद्ध व महिला वर्गासाठी आरामदायक सुविधा निर्माण झाली.

पांगरी बु. जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे

71

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित परिसर निर्माण करण्यात आला आहे.

पांगरी बु. रस्ता कॉक्रीटीकरण करणे

70

गावातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करून त्यांना पक्के व सुरक्षित बनवण्यात आले आहे, ज्यामुळे वाहतूक सुलभ झाली आहे.

पांगरी बु. समाजमंदिर बांधकाम करणे

69

गावात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी समाजमंदिर बांधण्यात आले असून, ग्रामस्थांना एकत्र येण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

पांगरी बु. कचरा विलीगीकरण शेड तयार करणे

68

गावात कचरा विलीगीकरण शेड उभारून त्यामध्ये सुका व ओला कचरा वर्गीकरणाची व्यवस्था करण्यात आली. यामुळे स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा झाली आहे.

पांगरी बु. महाऑनलाईन दाखले वितरीत

66

ग्रामपंचायतीमार्फत विविध शासकीय दाखले (उदा. रहिवासी, उत्पन्न, जात, इ.) महाऑनलाईन प्रणालीद्वारे जलद गतीने वितरीत करण्यात आले, त्यामुळे नागरिकांची वेळ व खर्च वाचला.

पांगरी बु. घंटा गाडी (सुका व ओला कचरा उचलणे)

63

गावात प्रत्येक घरापासून घंटा गाडी द्वारे सुका आणि ओला कचरा वेगळा करून नियमितपणे गोळा केला जातो, ज्यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनले आहे.

पांगरी बु. ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता मोहीम

61

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलणे, गटारींची स्वच्छता, व भिंतीवर जनजागृतीपर संदेश लिहिण्यात आले.